धर्म वाचवा म्हणणाऱ्यांचा पक्ष धोक्यात… रितेश देशमुख तुफान बरसले, भाषणाची चर्चा

Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest
Pocket
WhatsApp

Riteish Deshmukh : धर्माचं नाव घेऊन प्रचार करणाऱ्या पक्षांवर अभिनेता रितेश देशमुखने निशाणा साधला आहे. विधानसभा निवडणुकांच्या मतदानाचा दिवस जसजसा जवळ येतोय, तसतसा प्रचाराचा जोरही वाढत जातोय. सगळेच पक्ष सध्या दंड थोपटून प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. नेते मंडळींच्या भाषणांमधून रोज एकमेकांवर टीकांचा पाऊस पडतोय. त्यातच आता रितेश देशमुखच्या भाषणाची चांगलीच चर्चा होतेय. लातूरमध्ये धिरज देशमुख यांच्या प्रचारासाठी काँग्रेसची सभा पार पडली. या सभेमध्ये धिरज देशमुख यांचे बंधू आणि प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखही उपस्थित होता. यावेळी रितेश देशमुखने चांगलीच फटकेबाजी केली.

 

हे ही वाचा >>Maharashtra Vidhan Sabha : राज्यात महायुती पुन्हा बाजी मारणार? मविआला किती जागा मिळणार? : IANS सर्व्हे

विधानसभेच्या प्रचाराला चांगलीच धार आली असून, महायुती आणि महाविकास आघाडीच्या पक्षांची फौज सध्या मैदानात उतरली आहे. त्यातच आता आपल्या भावाच्या निवडणूक प्रचारासाठी रितेश देशमुखही मैदानात आहेत. काल लातूरमध्ये प्रचार करताना रितेश देशमुखने धर्माचं नाव घेऊन प्रचार करणाऱ्या पक्षांवर हल्लाहोल केला आहे.

 

काय म्हणाला रितेश?

प्रत्येक पक्ष म्हणतो धर्म धोक्यात आहे. धर्माला वाचवा, धर्म बचाव…अहो आमचा धर्म आहे, आमचा धर्म प्रिय आहे. प्रत्येक व्यक्तिला आपला धर्म प्रियच आहे. जे लोक म्हणतायत तुम्हाला, धर्माला वाचवा, धर्म धोके मे हैं, खरं म्हणजे ते धर्माला प्रार्थना करतायत, की आमचा पक्ष धोक्यात आहे, तुम्ही आम्हाला वाचवा.

Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest
Pocket
WhatsApp

Never miss any important news. Subscribe to our newsletter.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *